जान्हवी कपूर 'धडक'नंतर नैराश्यात...
Pune Tanker Accident| रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…! भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू…
Bigg Boss Marathi 6 : 'हा' तगडा स्पर्धक घराबाहेर; प्रेक्षकही झाले भावूक...
Advertisement

Pune Tanker Accident| रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…! भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू…

पुणे | पुण्यात पुन्हा एकदा टँकरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना राहीजा गार्डन्स परिसरातून पुणे कॅन्टोन्मेंट लष्करी भागाकडे जाणाऱ्या पुलाजवळ घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, या भागात यापूर्वीही अशाच प्रकारचे अपघात घडले असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्थानिकांनी या परिसरात वेगमर्यादा नियंत्रण, सिग्नल व्यवस्था आणि वाहतूक पोलिसांची कडक तैनाती करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

जान्हवी कपूर 'धडक'नंतर नैराश्यात...

Next Post

Bigg Boss Marathi 6 : 'हा' तगडा स्पर्धक घराबाहेर; प्रेक्षकही झाले भावूक...