Pune | पाच सोनोग्राफी केंद्रांवर कारवाईचा बडगा; पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत महापालिकेने मशिन्स केल्या सील...
Pune RTO | पुणे आरटीओकडून २०२५-२६ मध्ये महसूल १९२२.१२ कोटी रुपये वसूल; उद्दिष्टापेक्षा जास्त १०१.४२ टक्के कामगिरी..
IPL 2026 (KKR vs PBKS) | कोलकाता-पंजाब सामन्यात पावसाचा विजय...
Advertisement

Pune RTO | पुणे आरटीओकडून २०२५-२६ मध्ये महसूल १९२२.१२ कोटी रुपये वसूल; उद्दिष्टापेक्षा जास्त १०१.४२ टक्के कामगिरी..

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे मार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसूली, अंमलबजावणी व अनुषंगिक कामकाजाबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या १८९५.१७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत कार्यालयाने १९२२.१२ कोटी रुपये महसूल वसूल करत १०१.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

रस्ता सुरक्षा अंमलबजावणी अंतर्गत तपासणीत दोषी आढळलेल्या ६१ हजार ५०९ वाहनांवर ई-तपासणी कारवाई करण्यात आली असून, त्यातून २५.६८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक अनुज्ञप्ती व ५ हजार ५८४ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी करण्यात आले आहेत.

थकीत मोटार वाहन करापोटी ३२.२३ कोटी रुपये व पर्यावरण करापोटी ९.८० कोटी रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे. ई-लिलावाद्वारे १९३ वाहनांच्या विक्रीतून १.०६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ लाख १८ हजार ८४४ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या असून, ३ लाख ४५ हजार ५४३ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ५६ हजार १७२ पसंती क्रमांक आरक्षित करून त्यातून ७३.७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्यात आलाअसल्याची माहिती प्रादेशिक परिहवन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | पाच सोनोग्राफी केंद्रांवर कारवाईचा बडगा; पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत महापालिकेने मशिन्स केल्या सील...

Next Post

IPL 2026 (KKR vs PBKS) | कोलकाता-पंजाब सामन्यात पावसाचा विजय...