पुणे | दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ एप्रिलला मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचे नाव दिल्याने काही प्रमाणात धनगर समाज नाराज झाला आहे. त्यामुळे नाराज झालेंल्या पैकी कुणीतरी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर आहे.


