Advertisement

Pune | वानवडी आणि महंमदवाडीत २ भीषण अपघाताच्या घटना; २२ वर्षीय तरुणीसह तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये अवजड वाहनांच्या बंदीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. वानवडी आणि महंमदवाडी परिसरात अवघ्या ४८ तासांत दोन भीषण अपघात झाले असून, यात एका २२ वर्षीय तरुणीला आणि एका १९ वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आता महापालिकेविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास वानवडीतील गंगा सॅटेलाईट परिसरात ग्रेसिया डॅनियल (वय २२) या तरुणीला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरने चिरडले. तिचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी, ५ एप्रिल रोजी महंमदवाडीत आरिझ शेख या १९ वर्षीय फुटबॉलपटूचा अशाच प्रकारे टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. आरिझ हा बिशप स्कूलचा विद्यार्थी होता.

वारंवार तक्रारी करूनही निवासी भागातील टँकरच्या वेगावर आणि वेळेवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस व महापालिका अपयशी ठरली आहे. “बिल्डर्स आणि टँकर लॉबीच्या हितसंबंधांमुळे महापालिका या भागात पाईपलाईनने पाणी पुरवत नाही,” असा गंभीर आरोप स्थानिक रहिवासी दिलजीतसिंग गोराया यांनी केला आहे. महंमदवाडी, उंड्री आणि हांडेवाडीतील ५०-६० सोसायट्यांनी एकत्र येत आता न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. येत्या शनिवारी नागरिक या विरोधात ‘कॅन्डल मार्च’ही काढणार आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, “या भागात पाणीपुरवठा नसल्याने टँकरला पूर्णपणे बंदी घालता येत नाही. मात्र, आम्ही लवकरच नवी नियमावली तयार करण्यासाठी बैठक घेत आहोत.” शहरात बंदी असूनही अवजड वाहने भरवस्तीत कशी येतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PMC Pune | महापालिकेत प्रशासकीय खांदेपालट; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटेंकडे २३ विभागांची जबाबदारी...

Next Post

Pune | पाच सोनोग्राफी केंद्रांवर कारवाईचा बडगा; पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत महापालिकेने मशिन्स केल्या सील...