पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आलाय, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेचा ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामुळं या तिच्या मृत्यू्प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
वैष्णवी हगवणे हिने तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःचं एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामध्ये तिनं घटस्फोट घेण्याची भाषादेखील केली होती. तिन तिच्या मैत्रिणीला सासरकडून काय त्रास दिला जातो याचा खुलासा केला होता.
ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय?
मी खुश नाही. घटस्फोट घेण्याच विचार करत आहे. त्याच्यासोबत लग्नकरुन खुप त्रास झाला आहे. मला घरच्यांनी मारहाण केली. मी राहू शकत नाही खुप वैतागली आहे. तसेच, मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केलं नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असं म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत म्हणत होती.
मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीपण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितलं आहे. आपण त्यावर विचार करू, असं मला पप्पांनी सांगितलं आहे.
मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे, असंही ती या क्लिप म्हटली असल्याचे ऐकायला मिळत आहे.