तुकोबांचे मंदिर वर्षभरात पूर्ण होणार; मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, हे वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या वर्षभरात लोकार्पण सोहळा करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व मंदिर बांधकामाचे नियोजन करणारे गजानन शेलार यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 12 Feb 2025
  • 01:33 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

तुकोबांचे मंदिर वर्षभरात पूर्ण होणार

भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांची माहिती

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, हे वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या वर्षभरात लोकार्पण सोहळा करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व मंदिर बांधकामाचे नियोजन करणारे गजानन शेलार यांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिर ज्यांच्या स्थापत्यकलेतून उभारले गेले, ते चंद्रकांत सोमपुरा, निखिल सोमपुरा बंधू स्थापत्यविशारद म्हणून येथे कार्यरत आहेत. मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेश सोमपुरा या पिता-पुत्रांनी घेतली आहे.

गांधीनगर (गुजरात) येथील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरू आहे. मंदिराची लांबी १७९ फूट, उंची ८७ फूट व रुंदी १९३ फूट असून, मंदिराला तीन भव्य कळस आहेत. मंदिराचा घुमट ३४ फूट बाय ३४ फूट असून, १३.५ बाय १३.५ फूट आकाराची एकूण ५ गर्भगृहे मंदिरात असतील. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहात भक्तीमध्ये दंग झालेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिराच्या बाहेरील खांब चौरसाकृती व आतील खांब अष्टकोनाकृती असून, त्यावर ९०० वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर कोरीव काम असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबांचेही शिल्प

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व रयतेचे राज्य ही लोकशाहीपूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अमलात आणली, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिव्य शिल्पही साकारले जाणार आहे.

Share this story

Latest