पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आलाय, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे यांच्या आईने 'राजेंद्र हगवणे कुटुंबाला जन्मठेप झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलीसांनी वैष्णवीचा नवरा, सासू-सासरे, दिर आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल आहेत. वैष्णवीच्या लग्नाला केवळ दोन वर्षे झाले होते. तिने 10 महिन्यांपूर्वी एका बाळाला जन्म देखील दिला होता. पण ते बाळ कुठे आहे हे तिच्या आई वडिलांना माहिती नाही. अशी खंतही वैष्णवीच्या आईने व्यक्त केली आहे.
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती शशांक, सासू, दीर आणि नंदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 26 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वैष्णवीच्या आईशी माध्यमांनी संवाद साधला असता त्यांनी तिच्या बाळाचा उल्लेख करत हगवणे कुटूंबाला जन्मठेप झाली पाहिजे. असी मागणी केली आहे.
नेमकं म्हणाल्या वैष्णवी यांच्या आई?
बाळ झाल्यानंतर ती खुप आनंदी होती. पण जेव्हा तिच्या घरच्यांनी तिला मारहाण केली. तिला तिच्या दीराने मारलं तेव्हा तिची मनस्थिती बिघडली होती. मंचरला गेले होते तेव्हा तिचं आणि माझं शेवटचं बोलणं झालं होते. मंचरहून घरी परतले आणि फोन आला की वैष्णवी गेली म्हणून..आज त्या बाळाची अवस्था काय आहे? ते कुठे आहे? काहीच माहिती नाही.
माहेरी आली होती तेव्हा ती स्वतःला साड्या घेतली. सासुलादेखील तिनं साड्या घेतली. अशी आठवण सांगताना वैष्णवीची आई गहिवरली आणि पुढे म्हणाली, अजित पवार यांच्याकडे एकच मागणी आहे की, माझ्या मुलीला न्याय द्या. शिक्षा झाली पाहिजे त्या नराधमाला. संपूर्ण हगवणे कुटुंबाला जन्मठेप झाली पाहिजे.