पिंपरी-चिंचवड: पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम २० टक्के झाले आहे. सदरील इमारत ३६ महिन्यांत पुर्ण होणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून त्यात सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुर्नवापर करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

इमारत पर्यावरणपूरक, सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुनर्वापर; ३६ महिन्यांत काम पुर्ण होणार, सध्यस्थितीत २० टक्के काम पुर्ण

विकास शिंदे

महापालिकेच्या (PCMC) नवीन प्रशासकीय इमारतीचे काम २० टक्के झाले आहे. सदरील इमारत ३६ महिन्यांत पुर्ण होणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून त्यात सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुर्नवापर करण्यात आला आहे. इमारत पुर्ण झाल्यानंतर नागरीकांना महापालिकेची सर्व विभागाची कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून पालिकेच्या कामाकाजात सुसुत्रता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी नवीन इमारत बांधण्यात येत आहे. चिंचवड, ऑटो क्‍लस्टरसमोरील आरक्षण क्रमांक १८१ या ८.६५ एकराच्या भूखंडावर १३ मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. त्यासाठी केएमव्ही प्रोजेक्‍ट, हैदराबाद हे ठेकेदार काम करत असून त्यांना कामाचा आदेश जानेवारी २०२३ मध्ये देण्यात आला. इमारत कामाची मुदत ३६ महिने आहे. तर इमारत बांधकामासाठी स्वीकृत निविदा रू.२८६.६३ कोटी इतकी आहे. तर कामाचे सल्लागार म्हणून सुनिल पाटील असोसिएट प्रा.ली. हे आहेत.  केएमव्ही प्रोजेक्‍ट लिमिटेड हैद्राबाद या ठेकेदाराने रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून ८.१९ टक्के कमी म्हणजे २८६ कोटी रुपयांची निविदा सादर केली होती. संबंधित ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असून केएमव्ही प्रोजेक्‍ट लिमिटेड या ठेकेदाराकडून रॉयल्टी, मटेरियल टेस्टींग चार्जेसह दोनशे कोटी ६३ लाख रुपयांत काम करुन घेण्यात येणार आहे.

तसेच सदर इमारतीमध्ये महापालिका सर्वसाधारण सभागृह, सुसज्ज असे ग्रंथालय, प्रदर्शन दालन, बहु उद्देशीय सभागृह,नागरिक व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणीसाठी क्लिनिक, एटीएम सेंटर, ई-गव्हर्नन्स, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष, कोर्टयार्ड, स्वच्छतागृह, स्वागत आणि माहिती कक्ष, कॅन्टीन व पत्रकार कक्ष इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर इमारतीची रचना पर्यावरणपूरक, असून त्यामध्ये जलपुनर्भरण, सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुर्नवापर, स्कायलाइट, दोन व चार चाकी मिळून सुमारे ५ हजार वाहने पार्किंग आदी समावेश केलेला आहे.  प्रशासकीय इमारतीची उंची ८३ मी. एवढी आहे. इमारत पुर्ण झाल्यानंतर नागरीकांना महानगरपालिकेची सर्व  विभागाची कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, सध्याची महापालिकेची इमारत अपुरी पडत आहे. अनेक विभागांची कार्यालये इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. त्यामुळे तीन वर्षात नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

३०० नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था
महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी ३५ एकर जागा आहे. त्यापैकी ८.६५ एकर जागेत १३ मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. भविष्यातील ५० वर्षांचे नियोजन करून या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला.

महापालिकेच्या विविध विभागासह पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर सोयी असणार आहे. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीमध्ये वाहनतळ असणार आहे. त्यात ५०० मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत. तर, महापालिका सभागृहात ३०० नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅड असणार आहे.

नवीन इमारतीत चार असणार विंग
चिंचवड येथील महानगरपालिकेच्या आरक्षण क्र.१८१ ड या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे काम करण्यात येत आहे. या इमारतीच्या भूखंडाचे क्षेत्र  ८.६५ एकर (३७२३२.२५ चौ.मी.) एकूण बांधकाम क्षेत्र – ९१४५९  चौ.मी. (सुमारे १० लाख चौ. फूट) असणार आहे. तर नविन प्रशासकीय इमारतीमध्ये  पुढील प्रमाणे ४ विंग बांधण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत २० टक्के काम पूर्ण झाले असुन इमारतीचे संपुर्ण खोदकाम व फाऊंडेशनचे काम पुर्ण झालेले असून आता सर्वात खालील तळघराच्या स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे. स्लॅबवरील कॉलमचे काम पावसाळ्यात करणे शक्य होणार आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- प्रमोद ओंभासे, सह-शहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग, महापालिका

PCMC New Administration Building

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story