संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या जात आहेत. सोमवारी (१५ जानेवारी) दोन सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर मंगळवारी आणखी तिघांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. (Pimpri Chinchwad Police)
सोमवारी झालेल्या बदल्यांमध्ये देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांची सहायक आयुक्त, प्रशासन येथे बदली करण्यात आली आहे. तर घनवट यांच्या जागी प्रशासनचा कार्यभार असलेले सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे देहूरोड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad News)
मंगळवारी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे एक) बाळासाहेब कोपनर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग येथे बदली झाली. पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांचे वाहतूक शाखेत बदली झाली. तर भोसरी एमआयडीसी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे गुन्हे एकची विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच बरोबर २४ सहाय्यक निरीक्षक आणि २८ उप निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या चार दिवसात पिंपरी चिंचवड पोलीस दलातील ६ उपायुक्त, ५ सहाय्यक आयुक्त आणि १५० अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर पुढील दोन दिवसात अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.