संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
हवामान खात्याच्या अंदाजानूसार मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे. त्यामुळे पावसाला देखील सुरुवात होईल. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकार व्यवस्थेसाठी दिवा बत्ती यंत्रणा उभारली आहे. महापालिका विद्युत विभागाकडून दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम आवश्यकतेनूसार सुरु केले आहे. मात्र, शहरातील सर्व स्ट्रीट लाईट पोलची तपासणी करण्यात आली असून पोलला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक पोल, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन विद्युत विभागाने केले आहे.
नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षितेसाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची यंत्रणा उभारणेत आलेली आहे. दिवा बत्ती प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडून आवश्यकतेनुसार करण्यात येत आहे. शहरातील सर्व विद्युत अभियंत्यामार्फत नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी सर्व स्ट्रीट लाईट पोलची तपासणी करण्यात आली, तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळून येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. या कामांमध्ये काही उणिवा, त्रुटी अथवा कोणताही धोका आढळल्यास नागरिकांनी विद्युत विभागाकडे तक्रार करावी. तसेच इमारती व दिवाबत्तीचे खांबामधुन मनपाकडुन प्रकाश व्यवस्थेकरीता थ्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. तरीही नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असेही आवाहन विद्युत विभागाने केले आहे.
शहरातील धोकादायक स्ट्रीट लाईट पोल हात लावू नये, त्यात कोणतीही छेडछाड करु नये. यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्यास विद्युत विभाग जबाबदार रहाणार नाही.
-बाबासाहेब गलबले, सह-शहर अभियंता विद्युत विभाग, महापालिका
नागरिकांनी हे करावे
नागरिकांनी पथदिवे खांब, विद्युत य़ंत्रणेशी कोणती छेडछाड करु नये.
खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करु नये.
पथदिवे खांबातून विनापरवाना वीज घेऊ नये.
जनावरे खांबांना बांधू नयेत.
जंक्शन बॉक्सवर पाय ठेऊन खांबावर चढु नये.
कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधू नयेत.
बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये.
खांबांना फ्लेक्स ,होर्डिंग्ज बांधू नयेत.
कोणत्याही प्रकारची केबल, तार खांबावरुन ओढु नये.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.