Pimpri-Chinchwad: बिगारी कामगाराच्या झोपडीला आग; दहा लाखाची रोकड अन् चार तोळे सोनं जळून खाक

बिगारी कामगारांच्या घरातील लाखो रूपयांची रोकड आणि सोने जळून खाक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 11:13 am
fire news,PUNE NEWS,Pimpri News,Fire News,fire news,PUNE NEWS,Pimpri News,Fire News

Pimpri News

पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक समोर आली आहे. शहरातील बिगारी कामगारांच्या घराला आग  लागल्याची घटना घडली असून या घटनेत दहा लाखाची रोकड अन् चार तोळे सोनं जळून खाक झाले आहे. ही घटना पिंपळे गुरव परिसरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीत घडली. या घटनेनंतर इतकी रक्कम आली कोठुन? असा सवाल परिसरात उपस्थित होत आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीत आज सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. या आगीत लाखो रुपयांची रोख रक्कम आणि साडे चार तोळे दागिने पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणि मात्र, आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. जळालेल्या रोख रकमेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

करिअप्पा गुंडापुर या मुकादमाची ही झोपडी होती आणि त्याला सेन्टरिंगच्या ठेकेदारांनी दिल्याचं समोर आलं आहे. बानेरचे विठ्ठल पन्हाळे आणि हिंजवडीचे गजानन गदाडे अशी त्यांची नावं आहेत. पण या दोघा ठेकेदारांनी एवढी रक्कम कुठून आणली याचा तपास सांगवी पोलिस करत आहेत. 

Share this story

Latest