Pimpri-Chinchwad: पोलीस उपनिरीक्षकाला 30 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; पिंपरीत एसीबीची कारवाई

३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.

pimpri chinchwad crime, police, police sub inspector caught, bribe, acb , crime News

तक्रारदाराचे गुन्ह्यात जप्त केलेलं वाहन परत देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदाराचा वाहन गुन्ह्यात जप्त करण्यात आले होते. सदर वाहन परत देणे आणि गुन्ह्यात काही कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निलेश रमेश बोकेफ़ोडे (३८, पिंपरी पोलीस ठाणे) यांनी ४०,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कळवली.

एसीबीने १५ एप्रिल रोजी सापळा रचून आरोपीला ३०,००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन:

जर कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर खालील माध्यमांतून तक्रार नोंदवावी:

टोल फ्री क्रमांक: १०६४ / १८००२२२०२१

ई-मेल: [email protected]

वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in

ऑनलाइन तक्रार: www.acbmaharashtra.net.in

Share this story

Latest