संग्रहित छायाचित्र
निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी खंडोबा माळ चौकापर्यंतच्या सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असल्याने सदर सेवा रस्ता हा खड्डेमुक्त करण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा महेश काटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.५) घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकनगर, तुळजाई वस्ती, बाजाक ऑटो कॉलनी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी हातात घंटा घेऊन 'रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा', 'झोपलेल्या प्रशासनाचे करायचे काय खाली डोकं वर पाय' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. घंटेच्या आवाजांनी परिसर दणाणून गेला होता.आंदोलनाच्या वेळी केंद्रीय महाविद्यालय मा. प्राचार्य प्रकाश वाघमारे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे आण्णा कुराडे, वसंत सोनार काका, तसेच जनहित ज्येष्ठ नागरिक संघाचे विष्णुपंत गुल्हाने, गुणवंत रामटेके, मोहन जाधव, सुनील बिरजे, साळी काका, मनीषा ताई भारंबे, शोभा म्हेत्रे, संगीता ताई पवार ,रूपाली भालेराव, चित्रा कोठावदे, उज्वला जगदाळे, प्रियंका जगताप, वर्षा भोसले, विद्या परमार, मीनल भालेराव, पल्लवी कोंडेकर, नंदिनी वीरकर, सारिका सुतार, मंजुषा ताई, सुनिता पाटील, शीतल पाटील, वैशाली साळुंखे, आकाश गायकवाड फाउंडेशन, स्वानंद मित्र मंडळ व बजाज ऑटो कॉलनी येथील सर्व महिला यांनी आपला राग व्यक्त केला.
तसेच आपले मनोगत व्यक्त केले व दीपा काटेंचे आभार मानले. तरी प्रशासनाने कोणतीही जीवित हानी होण्यापूर्वी लवकरात लवकर या कामाची दखल घ्यावी अशी आम्हा सर्वांची विनंती असून प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा महेश काटे यांनी यावेळी दिला आहे.