रिव्हर प्लॉगेथॉन स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग स्वच्छतेविषयी कायम जागरूक असतो. नदी हा आपला सांस्कृतिक वारसा. याच नद्यांच्या आसपास असणारा घाट परिसर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Sat, 11 Jan 2025
  • 08:00 pm
Pimpri-Chinchwad, Municipal Corporation,Launch of River, Plogethon, Cleanliness Campaign,cultural heritage

संग्रहित छायाचित्र

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता जनजागृती मोहीम

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग स्वच्छतेविषयी कायम जागरूक असतो. नदी हा आपला सांस्कृतिक वारसा. याच नद्यांच्या आसपास असणारा घाट परिसर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला नदीच्या पावित्र्याबरोबरच तिथला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपणे आवश्यक असते. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ५ जानेवारी रोजी म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण घाट येथे 'रिव्हर प्लॉगेथॉन' स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संकलित कचऱ्याचे विलगीकरण करून अंदाजे ३ ते ४ टन कचरा गोळा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली. 'कचरामुक्त पिंपरी-चिंचवड' करण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, असा संदेश दिला गेला. स्वच्छतेतूनच प्रगती साध्य होईल, चला आपण सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प करून आपल्या शहराला कचरामुक्त बनवू या,असे आवाहन करण्यात आले.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन 

नदीचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून रिव्हर प्लॉगेथॉन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे आपण शहरातील सर्व नदी घाट स्वच्छतेचे नियोजन केले आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून कचरामुक्त पिंपरी-चिंचवड करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे.

Share this story

Latest