संग्रहित छायाचित्र
हॉटेलमधील कामगार महिलेला ठरविलेल्या रकमेपेक्षा कमी पगार दिला. याबाबत तिने विचारणा केली असता तिला मारहाण करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी या गावात बुधवारी (दि. ८) सायंकाळी घडली.याबाबत ३५ वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत मधुसूदन बारीक (वय ३५, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुरुळी येथील हॉटेल बिलाल स्नॅक्स सेंटर येथे मजुरीचे काम करते. आरोपीने फिर्यादी महिलेला ६०० रुपये मजुरीच्या रकमेपैकी ५२० रुपये दिले. याबाबत तिने विचारणा केली असता आरोपी प्रशांत याने तिला शिवीगाळ करीत ढकलून दिले. तिचा विनयभंग करीत लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.