संग्रहित छायाचित्र
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालवणाऱ्या 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा (Accident News) मृत्यू झाला आहे. हा अपघात खेड तालुक्यातील (Khed taluka) कडाचीवाडी येथे सोमवारी (दि.20) घडला आहे .
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police) दिलीप प्रभाकर भारत ( वय 48 रा.चाकण) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात बापू बाबुराव सांडभोर (वय 74 रा. किवळे) यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांचे मामा बापू सांडभोर हे त्यांच्या दुचाकीवरून किवळे येथे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.यावेळी अपघाताची माहिती न देता व उपचारासाठी मदत न करता वाहन चालक फरार झाल्याने अज्ञात चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.