संग्रहित छायाचित्र
पुण्यात अचानक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ व मेंदूविषयक आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात देखील तब्बल 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य वैद्यकीय यंञणा अल॔ट झाली आहे. त्या रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अचानक 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जिबीएस) या दुर्मिळ व मेंदूविषयक (न्युरॉलॉजिकल) आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
'गुलियन बॅरी सिंड्रोम' हा दुर्मिळ विकार असून तो 'ऑटो इम्युन' गटातील म्हणजेच स्वतःच्या शरीरावर हल्ला करणारा लक्षणांचा समूह (सिंड्रोम) आहे. तो काही संसर्गजन्य नाही किंवा तो कोणत्या एका संसर्गजन्य आजारामुळे पसरतही नाही. त्यामुळे हात पायांमधील ताकद जाते आणि त्याने रुग्णाच्या हालचालीवर मर्यादा येतात किंवा तो हालचाल करू शकत नाही. त्या रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात कुठे, किती रुग्णसंख्या
एकूण 59 रुग्णांपैकी 33 रुग्ण पुणे ग्रामीण, 11 रुग्ण पुणे महापालिका, 12 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. त्यापैकी 38 पुरुष आणि 21 महिला आहेत.12 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.