पिंपरी : मराठा आरक्षण आंदोलन, गणेशोत्सव आणि आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी पोलिसांच्या वतीने चिंचवड परिसरात रूट मार्च (फ्लॅग मार्च) काढण्यात आला.
शनिवारी सायंकाळी चिंचवड गाव, जुना बाजार, स्टेशन परिसर, टेल्को रोड आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि क्यूआरटी पथकाच्या उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला. यामध्ये स्थानीक पोलीस ठाण्याचे अधिकारी, होमगार्ड्स आणि राज्य राखीव पोलिस दलाचे जवान सहभागी झाले होते.
“सणासुदीच्या काळात कोणतीही गोंधळाची किंवा अनुचित घटना घडू नये, नागरिकांनी शांतता व सौहार्द राखावे,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे. रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पोलीस सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.


