Advertisement

PCMC | पवनेचे पात्र की खेळांचे मैदान? चिंचवड येथे मातीचा भराव घातल्याने नदीपात्र झाले अरूंद….

चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयाजवळ मातीचा भराव घातल्याने नदीपात्र झाले अरूंद; दोषींवर कारवाई करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी

पिंपरी-चिंचवड : शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होऊ लागले आहे. चिंचवडच्या बिर्ला रुग्णालय येथील नदी पात्रालगत परिसरात मातीचा भराव टाकला जात आहे. नदीकाठावरील झाडाच्या बुंध्याला माती टाकून बुजविले जात आहेत. यामुळे नदीचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. तसेच अनेकांनी नदीपात्रात व्यावसायिक दुकाने, क्रीडांगणे, स्पोर्टर्स अकॅडमी तयार केल्या आहेत. त्यामुळे पवना नदीचे पात्र अरुंद होत अतिक्रमण वाढू लागले असून, महापालिकेच्या पर्यावरण आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून मात्र, दुर्लक्ष होत आहे.

चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयाजवळ पवना नदीकाठावर झाडे तोडून टाकली जात आहेत. तर काही झाडांच्या बुंध्याला माती टाकून ती झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जावू लागली आहेत. यामुळे नदीकाठची जैवविविधता आणि झाडाचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

सद्यस्थितीत शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची अवस्था खूपच गंभीर आहे. नद्यांची स्थिती बदलण्यासाठी नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हे प्रकल्प अजून कागदावरच असताना अज्ञाताकडून नदीकाठी मातीचे भराव टाकत नदीचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. चिंचवडच्या पवना नदीपात्रालगत दिवसाढवळ्या राडारोडा व मातीचा भराव टाकून नदीचे पात्र अरुंद केले जात आहे. नदी सुधार प्रकल्प कागदावरुन अस्तित्त्वात येण्यापूर्वीच नद्यांचे अस्तित्त्व संपुष्टात येऊ लागले आहे.

दरम्यान, नदीच्या पात्रालगत माती, राडारोडा टाकून पात्र अरुंद करत नदीचे नाला बनविला. तरीही महापालिका पर्यावरण, बांधकाम आणि क्षेत्रीय अधिकारी हे डोळे झाकून पवना नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहात आहेत. संबंधितावर कारवाई न करता दुर्लक्ष करुन नदीपात्र अरुंद करण्यात अधिकारी देखील हातभार लावू लागल्याचे दिसून येत आहे.

नदीपात्रात तयार केली क्रीडांगणे, स्पोर्टर्स अकॅडमी

पवना नदीपात्रात दगड, माती, राडारोडा टाकून मैदाने तयार केली जात आहेत. चिंचवड भागात देखील आता नदीपात्रालगत मातीचा भराव, राडारोडा टाकली जात आहे. अनेकांनी व्यावसायिक दुकाने, विविध क्रीडांगणे, स्पोर्टर्स अकॅडमी तयार बनविली आहेत. त्यामुळे पवना नदीचे पात्र अरुंद होत अतिक्रमण वाढू लागले आहे. या अतिक्रमणावर महापालिका ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय आणि माती व भराव टाकणा-यावर पर्यावरण विभाग कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रसायनमिश्रित पाण्यामुळे नदी झाली गटारगंगा

शहरात वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. सातत्याने नदीपात्रात मिसळले जाणारे मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक रसायनांच्या पाण्यामुळे नदीची गटारगंगा झाली आहे. असे असताना आता पात्रात भराव टाकून पात्र अरुंद करण्याचे काम सुरू आहे. महापालिका हद्दीत पवना नदी पात्राचे अस्तित्व जागोजागी संपुष्टात येऊ लागले आहे. पात्रालगत अनेक स्थानिकांच्या जागा आहे. त्या जागा रेड लाईन, ब्लू लाईन आणि पुररेषेत येत आहेत. स्थानिक जागा मालकांकडून थेट नदीत मातीचा भराव, राडारोडा टाकून नदीचे पात्र अरुंद करु लागले आहेत.

नदी आहे की नाला? अशी नदीची स्थिती

चिंचवड येथील पवना नदीपात्रालगतची परस्थिती खुपच बिकट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी ही नदी आहे की, नाला अशी स्थिती निर्माण झाली आहे. माती आणि राडारोडाचा भराव तर काही ठिकाणी थेट दगड टाकत नदीची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून होऊ लागला आहे. पवना नदीपात्रात भराव टाकल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रातून पाणी बाहेर येऊन महापूर येण्याची दाट शक्यता आहे. पवना धरणक्षेत्रात अधिक पाऊस पडल्यास शहराच्‍या अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरते. शहरात अनेकदा मोठे पूरही आले आहेत. अशी स्थिती असतानाही मातीचे भराव टाकून पूरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जात आहे.

राडरोडा टाकणाऱ्यांवर कारवाईचा केवळ फार्स

पवना नदी तीरावर अनेकांनी पूररेषेत अतिक्रमण केले आहे. नदीपात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविले आहे. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. पर्यावरण व बांधकाम विभागाकडून कारवाईचा फक्त फार्स केल्याचे दिसत आहे. त्यामुळे दररोज पवना नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

BCB | बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सहा संचालकांचा राजीनामा, अंतर्गत मतभेदामुळे मोठी उलथापालथ...

Next Post

PMC Pune | महापालिकेत प्रशासकीय खांदेपालट; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटेंकडे २३ विभागांची जबाबदारी...