– शहरातील परवानगी अगोदर उभाराहेत होर्डिग
वादळी वा-यामुळे पावसाळ्यात होर्डिग पडून अनेक दुर्घटना घडत आहेत. काही दिवसापुर्वी किवळे येथे होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाने कारवाईचा फार्स केला. परंतु आता पुन्हा नव्याने शहरात अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज उभी राहू लागली आहेत. च-होली या ठिकाणी धोकादायक पध्दतीने कामगार काम करत हे भले मोठे होर्डिग उभारले जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो होर्डिंग्ज अनधिकृत असूनही त्याकडे महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. हे होर्डिंग अधिकृत असो की अनधिकृत जर ते व्यवस्थित नियमानुसार बसविले नसेल तर ते जीवघेणे ठरू लागले आहे. मागील विविध घटनांमध्ये एकूण सात जणांचा बळी गेला आहे. होर्डिंग्जबाबत महापालिकेचे नसलेले ठोस धोरण व आकाश चिन्ह परवाना विभागात होर्डिंग्ज व्यावसायिकांना व त्या मागील राजकीय नेत्यांच्या समर्थकांना पोसण्याची मनोवृत्ती संपत नाही, तोपर्यंत अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट असाच सुरु राहू लागला आहे.


