Advertisement

लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे : दिघी परिसरात गुरुवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत ११ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. अमेय फडतरे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, या अपघातामुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय लिफ्टसोबत खेळत होता. जिन्याने वर जाऊन पुन्हा लिफ्टने खाली येण्याचा हा खेळ काही मिनिटे सुरू होता. मात्र, या खेळातच मोठा अनर्थ घडला. लिफ्टच्या दरवाजाच्या मधल्या जागेत तो अडकला आणि गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात अडकलेल्या अमेयला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अमेयचा मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली असून, दिघी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

"मी अजित पवारांचा सुद्धा कार्यक्रम लावेन", जरांगे पाटलांचा आता अजित पवारांना इशारा

Next Post

घरफोडी करणारा चोरटा गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त