Advertisement

PCMC | रिक्षा चालकांकडून नागरिकांची मनमानी लूट; ई-मीटर डावलून ओन्ली मीटरचा वापरुन सक्तीने भाडे वसुली…

पुणे  : ई-मीटरला डावलून पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकांकडून अगोदरच मनमानी लूट चालू असताना आता ‘ओन्ली मीटर’ या खासगी संकेतस्थळाचा वापर करुन रिक्षाचालक प्रवाशांकडून सक्तीने भाडे आकारत आहेत. त्यामुळे ‘ओन्ली मीटर’चा वापर करुन पैसे घेण्याची सक्ती का ? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये रिक्षांना ई-मीटर बसविणे बंधनकारक केले. परंतु, पिंपरी चिंचवडमध्ये साधारणत: एक-दोन वर्षांनंतर रिक्षाचालकांनी ई-मीटर बंद असल्याचे सांगून ठरवून भाडे आकारण्याची पद्धत सुरू केली. परिणामी, एकाच मार्गावर, एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जाऊ लागले. कालांतराने ‘ओला’, ‘उबेर’ आणि ‘रॅपिडो’ यासारख्या काही कंपन्यानी ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली.

मात्र, गेल्या वर्षीपासून ऑनलाइन ॲपआधारित सेवा देणाऱ्या कंपन्या चालकांना दर कमी देत असल्याचे कारण पुढे करत काही रिक्षा, कॅब चालक आणि काही संघटनांकडून त्यानुसार भाडे आकारणी नाकारली जात आहे.

भाड्यात तफावत

खासगी ॲपवर बुकींग करताना प्रवाशांना वेगळे भाडे दिसते आणि प्रत्यक्षात रिक्षाचालकाकडून वेगळा भाडे आकारले जाते. ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरील भाडे हे ॲपवरील भाडेदरापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन विभागाची कोणतीही मान्यता नसताना या संकेतस्थळाचा सर्रास वापर करुन भाडे आकारणी केली जात आहे.

आरटीओ निरीक्षकाने कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षा मीटरचे दर वैध आहे. कोणतेही ॲप किंवा संकेतस्थळाचे मीटर अवैध असून त्याप्रमाणे आकारलेले भाडे कायद्याला धरुन नाही.
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

रिक्षा चालक ॲपद्वारे भाडे स्वीकारतात. पण, पैसे घेताना मात्र ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळाचा वापर करुन किती किलोमीटर झाले. त्यानुसार पैसे घेतात. ही नागरिकांची एकप्रकारे फसवणूक आहे.
– राहुल शिंदे, प्रवासी

 

रिक्षा चालकांनी रिक्षामध्ये बसवलेल्या ई-मीटरप्रमाणेच पैसे घेतले पाहिजेत. प्रवाशांनीही मीटरप्रमाणेच पैसे द्यावेत. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात सांगड घालण्यासाठी ॲपचा वापर करावा. पण, भाडे ठरविण्याचा कोणत्याही ॲपला अधिकारच नाही.
– नितीन पवार, अध्यक्ष, रिक्षा पंचायत, पुणे पिंपरी चिंचवड

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Crime | पोलिसाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४३ लाखांचा गंडा; पिंपरीत तिघांची फसवणूक

Next Post

PMC Pune | काँक्रीटच्या रस्त्यांना बसणार लगाम? छोट्या रस्त्यांसाठी डांबरीकरणालाच प्राधान्य....