पिंपरी-चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका

हिंजवडी येथे द वेदा स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.

Sex Racket

पिंपरी-चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत केली

हिंजवडी येथे द वेदा स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर (Sex Racket) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (१ मे) रात्री साडेआठ वाजता करण्यात आली. (Pimpri Chinchwad Crime) 

 ऋषिकेश मुकेश निकाळजे (वय २४, रा. किवळे), स्पा चालक व मालक गणेश राजाराम घेवडे (वय ३५, रा. म्हाळुंगे) व रितेश (वय ३२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार भगवंता चिंधू मुठे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरमध्ये चार मुलींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी स्पा सेंटरवर छापा मारला. यामध्ये चार महिलांची पोलिसांनी सुटका करून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालावर गुन्हा दाखल केला आहे. 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार प्रशांत महाले, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, राजाराम सराटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने, पूनम आल्हाट यांनी ही कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest